महाराष्ट्र रुद्र आहे, पण रुक्ष नाही. सह्याद्री, सातपुड्याचे कवच त्याला, पण नुसता दगडधोंडा नाही. कातळाचा कोट इथे...अन् त्यातून पाझरणारे हृदयही...खडगांचा खणखणाट इथे, छन्नी-हातोड्याचा शिल्पतालही..!
शेकडो वर्षांपासून महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडते, ते येथील लेण्या, मंदिर, वाडे-राजवाडे, गड-किल्ल्यांतील शिल्पघडनातून... अनादी कालापासूनच्या आपल्या अस्तिवाचे ही जणू संस्कृती अलंकारच. काळ्या पाषाणातील हृदयाची ही मनप्रतिकं...भुलेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, गोंदेश्वर, खिद्रापूर-कोपेश्वर, रतनेश्वर, काळाराम, महालक्ष्मी, अंबरनाथ, वेरूळ, अजिंठा, रायगड, देवगिरी, हरिहर, नळदुर्ग अशीही शेकडो आविष्कार स्थळे! जेव्हा-जेव्हा आपण त्याची अनुभूती घेतो, तेव्हा भक्ती-शक्तीचा हा भाव रेखटणाऱ्या या शिल्पकारांच्या कलाकृती पुढे नतमस्तक होतो..
...कसा कातला गेला असेल हा दगड? खरोखरच दिव्य महतकार्य ! या चिवट पाथरवटांनी अतिशय टणक आणि दणकट कातळाला असे-कसे लीलया मढविले, की अगदी एखाद्या कसबी सुवर्ण अलंकारही फिका पडावा... सभामंडपावरील नृत्यांगणेच्या गळ्यातील अलंकार असो, की आकाशाला गवसणी घालणारे मंदिरस्तंभ ! कुशावर्ताचे कुंडसौंदर्य असो, भुलेश्वर-खिद्रापूरचे कलाशिल्प असो, की वेरूळचे कळसापासूनचे निर्माण !! अप्रतिम, अविश्वसनीय, अलौकिक !!!
महाराष्ट्रातील या अभिजात निर्मितीवर विध्वंसकांनी घणाचे घाव घातले जरी असले, तरी तिचे निर्माण करताना, एकही छंद उडू न देणाऱ्या त्या कलाधुंद शिल्पकारांना...महाराष्ट्र संस्कृतीला अलंकृत करणाऱ्या अज्ञातांच्या या कलाशक्तीला, आविष्काराला, अभिव्यक्तीला मन:पुर्वक अभिवादन!
- आनंद गाडे